Ad will apear here
Next
पोटे यांनी घेतली दोन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी
महिला दिनानिमित्त अभिनव उपक्रम
नगरसेवक दीपक पोटे यांच्यासह महिलाश्रम हायस्कूलच्या विद्यार्थीनी आणि मुख्याध्यापिका व सहकारी

पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त नगरसेवक आणि पुणे शहर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक पोटे यांनी महिलांसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूलमधील ऐश्वर्या सुकुमार कल्याणी आणि प्रणिता संपत खेडेकर या दोन मुलींची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी उचलली आहे. 

शाळेला भेट देऊन त्यांनी या मुलींच्या शिक्षणाच्या खर्चासाठीच्या रकमेचा धनादेश शाळेकडे सुपूर्द केला. या वेळी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मधुमालती वेदपाठक, उपमुख्याध्यापिका उषा मेहेंदळे आणि सहकारी उपस्थित होते. नुसते बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून पोटे यांनी सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZVGBY
Similar Posts
आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना आरक्षणाचा निर्णय स्वागतार्ह पुणे : ‘उच्च जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी नोकऱ्या व शिक्षणसंस्थांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहासिक आणि न्यायाला धरून आहे. मी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करतो’, अशी प्रतिक्रिया खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केली.
‘आकांक्षा’ फुलवणारी ‘बालरंगभूमी’ पुण्यातल्या ‘आकांक्षा बालरंगभूमी’ या संस्थेत मुलांना हसत-खेळत नाट्यप्रशिक्षण दिलं जातं. मुलांचं व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठीही प्रयत्न केले जातात. मुख्य म्हणजे हे सगळं करताना मुलांना कलेचा आनंद मिळवून देण्यालाच प्राधान्य दिलं जातं. अशा या वैशिष्ट्यपूर्ण ‘आकांक्षा बालरंगभूमी’चे संस्थापक सागर लोधी यांच्याशी
सुरेश नाईक स्पेस पार्कतर्फे शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ क्षेत्राचा अनुभव देणाऱ्या शिबिरांचे आयोजन पुणे : हिंजवडी येथील सुरेश नाईक स्पेस पार्कतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्च आणि एप्रिल महिन्यात दोन दिवसांच्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्रात रस आहे, त्यांना अंतराळ विज्ञानातील विविध गोष्टींचा अनुभव घेता यावा, यासाठी या संस्थेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते
श्री साई नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आर्थिक मदत पुणे : श्री साई नागरी सहकारी पतसंस्था व साई एसके ग्रुप यांच्यातर्फे पुणे जिल्ह्यातील अपंग विकास मंचास एक लाख रुपयांचा धनादेश आणि कपडे; तसेच पाचाणे गावातील आभाळमाया संस्थेच्या सर्व अनाथ व गरजू मुलींना धान्यवाटप व कपडे वाटप करण्यात आले. या वेळी डॉ. जयश्री फडणवीस, कोहिनूर उद्योग समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language